‘एस्सार स्टील’ची कर्ज फेडण्याची तयारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

मुंबई - एस्सार स्टीलच्या प्रवर्तकांनी कंपनीवरील ५४ हजार कोटींचे कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. कर्जफेडीचा प्रस्तावाद्वारे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादापुढील (एनसीएलटी) दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून मुक्‍त होण्याचा प्रयत्न एस्सार व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे सर्वाधिक बोली लावलेल्या पोलाद उद्योगातील आर्सेलर मित्तलसाठी ‘एस्सार‘चा निर्णय धक्कादायक ठरला आहे. 

‘एस्सार स्टील’ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात कमिटी ऑफ क्रेडिटर्सपुढे (सीओसी) कंपनीने कर्जफेडीचा प्रस्ताव सादर केला आहे. 

दिवाळखोरी आणि नादारी विधेयकाच्या ‘कलम १२ ए’ अंतर्गत कंपनीने हा प्रस्ताव सादर केला असून, कंपनीवरील एकूण ५४ हजार ३८९ कोटींच्या कर्जापैकी ४७ हजार ५०७ कोटी रोकड स्वरूपात दिली जाणार आहे. तेल आणि वायू व्यवसायातील प्रतिकूल परिस्थिती आणि बाह्य घटकांमुळे एस्सार स्टीलला राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे धाव घ्यावी लागली. 

कंपनीचा प्रस्ताव मान्य करण्याचे अधिकार ‘सीओसी’ला आहे. ‘सीओसी’ने मतदानाच्या आधारे हा प्रस्ताव मान्य केल्यास ‘एस्सार’वरील दिवाळखोरीची प्रक्रिया संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून निधी उभारणीचे स्रोत विकसित केले जात होते. कर्जे आणि इतर देणी फेडण्याचा विस्तृत प्रस्ताव तयार केला असून, त्यावर अंमलबजावणी केली जाईल. 
- प्रशांत रुईया, एस्सार स्टीलचे संचालक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Essar Steel Loan