बाजारात ‘एक्झिट पोल्स’चा उत्साह; सेन्सेक्स 150 अंशांनी वधारला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई: उद्या जाहीर होणाऱ्या निवडणुक निकालांच्या 'एक्झिट पोल्स'मुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 150 अंशांची वाढ झाली असून निफ्टीचा 9000 अंशांच्या पातळीच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनुसार उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सध्या(9 वाजून 40 मिनिटे) सेन्सेक्स 54.87 अंशांनी वधारला असून 28,984.00 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 8,944 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत असून 17.90 अंशांनी वधारला आहे. बाजारात ऑईल अँड गॅस क्षेत्रात विक्रीचा किंचित दबाव दिसून येत आहे. इतर सर्व क्षेत्रांमध्ये मात्र तेजीसह व्यवहार सुरु आहे.

निफ्टीवर आयडिया सेल्युलर, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट्स, अदानी पोर्ट्स आणि टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर पॉवरग्रिड कॉर्पोरेशन, बीपीसीएल, ओएनजीसी, गेल आणि ग्रासिमचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: Exit polls project Modi gains: D-Street braces to see Nifty, Sensex hit new highs on Friday