प्राप्तिकर भरण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मुंबई : चालू आर्थिक वर्ष 2017-18 साठी प्राप्तिकर भरण्याची आणि ऑडिट रिपोर्ट फायलिंग करण्याची शेवटची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ही मुदत 15 ऑक्टोबर होती. मात्र करदात्यांच्या मागणीमुळे यात वाढ करण्यात आली आहे. मात्र, उशिरा आयकर भरणाऱ्यांकडून दंडही वसूल केला जाणार आहे. 

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडे करदात्यांच्या प्रतिनिधींनी ही मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. करदात्यांच्या प्रतिनिधींनी केलेल्या आवाहनामुळे विशेष वर्गातील करदात्यांना प्राप्तिकर भरणा करण्याकरिता आणि ऑडिट रिपोर्ट सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांना दिलेली मुदत वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे, असं सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने म्हटलं आहे. दरम्यान, प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 234 ए (स्पष्टीकरण 1) अन्वये मुदतवाढ देता येत नाही. हेच कलम प्राप्तिकर न भरणाऱ्यांकडून व्याज वसूली संदर्भातील सुद्धा आहे. त्यामुळे कलम 234 ए नुसार करदात्यांना प्राप्तिकर भरताना दंडापोटी व्याज भरावे लागणार आहे. 

सीबीडीटीने यापूर्वीच नियमित कर भरणा करणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार पगारदार करदाते आणि नियमित उत्पन्न नसणाऱ्या करदात्यांमध्ये 71 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 31 ऑगस्ट 2018 पर्यंत करदात्यांचा हा आकडा 5 कोटी 42 लाख एवढा होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension for file Income Tax till October 31