'प्रधानमंत्री वय वंदन योजने'ला मुदतवाढ

वृत्तसंस्था
Wednesday, 20 May 2020

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन देणाऱ्या प्रधानमंत्री वय वंदना योजनेला (पीएमव्हीव्हीवाय) केंद्र सरकारने तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा कालावधी आता 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याआधी ही योजना 31 मार्च 2020 पर्यंतच सुरु होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदना योजनेला (पीएमव्हीव्हीवाय) तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा कालावधी आता ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र, हे करताना या योजनेच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी नवी दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत वय वंदना योजनेला तीन वर्षांची मुदतवाढीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे योजना?
ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ६० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी केंद्र सरकारची ही पेन्शन योजना असून, योजनेचा लाभ एकरकमी पैसे भरून घेता येतो. यापूर्वी या योजनेत गुंतवणुकीसाठी ३१ मार्च २०२० ही अंतिम मुदत होती.

लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये भारतातील कार्बन उत्सर्जनात २६ टक्क्यांची घट

परताव्यात कपात
आधीच्या योजनेत पूर्ण १० वर्षे निश्‍चित व्याजदराने (८ ते ८.३० टक्के) पेन्शन दिले जात होते. आता तसे न होता, वार्षिक तत्वावर व्याजदर बदलता राहणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सरकारकडून वार्षिक ७.४० टक्के दराने परतावा निश्‍चित केला आहे. पुढील नऊ वर्षांसाठीचा परताव्याचा दर त्या-त्या वर्षी आढावा घेऊन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला (१ एप्रिल) जाहीर केला जाणार आहे. परताव्याचा दर हा "सिनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम'च्या (एससीएसएस) सुधारित व्याजदराशी सुसंगत ठेवला जाईल व त्यासाठी ७.७५ टक्‍क्‍यांची मर्यादा असेल. परताव्याचे दर निश्‍चित करण्याचे अधिकार केंद्रीय अर्थमंत्र्यांना देण्यात आले आहेत. थोडक्‍यात, पूर्वीच्या योजनेप्रमाणे सुरवातीचा व्याजदर हाच मुदत संपेपर्यंत (१० वर्षे) कायम राहणार नाही. योजनेंतर्गत किमान गुंतवणुकीत सुधारणा करण्यात आली असून, दरवर्षी १२,००० रुपये पेन्शन मिळण्यासाठी १,५६,६५८ रुपये आणि दरमहा १००० रुपये पेन्शन मिळण्यासाठी १,६२,१६२ रुपये इतकी गुंतवणूक करावी लागेल. हा योजनेतील गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत करसवलत वा करवजावट मिळत नाही. तसेच पेन्शनच्या रुपात मिळणारी रक्कम सध्याच्या कायद्यानुसार करपात्र असेल.

रिलायन्सचा राईट्स इश्यू झाला खुला 

पेन्शन कधी मिळणार?
या योजनेचा कालावधी १० वर्षे असून, पेन्शन दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने घेण्याचा पर्याय आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) माध्यमातून योजनेची अमलबजावणी केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension for PMVVY till 31 March 2023