व्हॉट्सऍपवरून करता येणार 'क्रिप्टोकरन्सी'चे व्यवहार

व्हॉट्सऍपवरून करता येणार 'क्रिप्टोकरन्सी'चे व्यवहार

मुंबई: फेसबुक लवकरच 'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून व्हर्च्युअल म्हणजेच 'क्रिप्टोकरन्सी'चे व्यवहार सुरु करण्याची शक्यता आहे. सरलेल्या वर्षात जगभर चर्चेत असलेली क्रिप्टोकरन्सीचा वापर आता  'व्हॉट्सअॅप'च्या माध्यमातून करता येणार आहे. गेल्यावर्षी बिटकॉइन या 'क्रिप्टोकरन्सी'ने 19,783 अमेरिकी डॉलरची उच्चांकी पातळी गाठली होती. तेव्हापासून 'क्रिप्टोकरन्सी' सर्वांच्या चर्चेचा विषय झाला. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आता डिजीटल पैशांचे व्यवहारही करता येणे शक्य होणार आहे. 

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक नवीन डिजीटल कॉइन्स 'व्हॉट्सअॅप'वर आणण्याची शक्यता असून हे डिजीटल कॉइन्स मॅसेजप्रमाणेच समोरच्याला सेन्ड करता येतील. प्रत्येक कॉइनचे डॉलरमध्ये व संबंधित देशांच्या चलनामध्ये मुल्य असेल. यानुसार ठराविक कॉइन्स पाठवून पैशांचे व्यवहार आता करता येणार आहेत. ही कल्पना सध्या प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत असून ती यशस्वी झाल्यास  'व्हॉट्सअॅप' डिजिटल मनी व्यवहार सुरु करण्याची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com