गैरव्यवहारांचे आरोप खोटे

पीटीआय
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

लंडन - प्रत्यार्पणाच्या संदर्भातील खटल्याच्या सुनावणीवेळी आपले म्हणणे मांडण्यासाठी सध्या लंडनमध्ये असलेला कर्ज बुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याने आज वेस्टमिन्स्टर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजेरी लावली. आपल्या विरोधात केलेले आरोप खोटे असल्याचा दावा मल्ल्या याने केला. 

मल्ल्या म्हणाला, की या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असून, आता न्यायालयच याबाबत काय तो निर्णय घेईल.   या खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे ‘सीबीआय’ने सादर केली आहेत. आयडीबीआय बॅंकेचे उपव्यवस्थापकीय संचालक बी. के. बत्रा यांच्याशी हातमिळवणी करून मल्ल्याने मोठा गैरव्यवहार केल्याचा दावा ‘सीबीआय’कडून करण्यात आला आहे. 

तुरुंगाची स्थिती चांगलीच
मल्ल्याला भारताच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला आर्थर रोड तुरुंगात ठेवले जाणार आहे. ‘भारतातील तुरुंगांची स्थिती इतर देशांइतकीच चांगली असून, कैद्यांच्या हक्कांचे येथे संरक्षण होते, मल्ल्या मात्र जिवाला धोका असल्याचे कारण सांगत दिशाभूल करत आहे,’ असे गृहमंत्रालयाने सांगितले. मल्ल्या याला ठेवण्याचे नियोजन असलेल्या तुरुंगाचा व्हिडिओ तीन आठवड्यांच्या आत सादर करण्याची सूचना ब्रिटनमधील न्यायालयाने केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: False charges are false