दूरसंचार क्षेत्रात 10 अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यातच भारतातील दूरसंचार क्षेत्रात 1 अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे, अशी माहिती दूरसंचार सचिव जे. एस. दीपक यांनी दिली.

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यातच भारतातील दूरसंचार क्षेत्रात 1 अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली आहे, अशी माहिती दूरसंचार सचिव जे. एस. दीपक यांनी दिली.

मागील वर्षीच्या तुलनेत दूरसंचार क्षेत्रातील एफडीआयमधील परदेशी गुंतवणूकीत सहा पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये दूरसंचार क्षेत्रात 1.33 अब्ज डॉलर परदेशी गुंतवणूक करण्यात आली होती. तर 2014-15 मध्ये त्यात वाढ होऊन ती 2.9 अब्ज डॉलरवर पोचली होती. तर आर्थिक वर्ष 2015-16 मधध्ये 1.33 अब्ज डॉलर एवढी परदेशी गुंतवणूक झाली होती. मात्र चालू आर्थिक वर्षात त्यामध्ये सहा पट वाढ होऊन ही गुंतवणूक 10 अब्ज डॉलरवर पोचली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार राबवित असलेल्या सुधारणांचा हा परिणाम असल्याचेही दीपक यांनी यावेळी सांगितले.

Web Title: FDI in communication sector