‘एफडीआय’चा ओघ कायम

FDI
FDI

न्यूयॉर्क - भारताने चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत २२ अब्ज डॉलरची थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) एका अहवालातून समोर आली आहे. परकी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या ‘टॉप-१०’ देशांच्या यादीत भारताने यंदाही आपले स्थान कायम राखले आहे.  

यूएनच्या व्यापार व विकास परिषदेने सोमवारी ‘इन्वेस्टमेंट ट्रेड मॉनिटर’ हा अहवाल प्रसिद्ध केला. भारताने आकर्षित केलेल्या २२ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीमुळे दक्षिण एशियातील एकूण ‘एफडीआय’मध्ये १३ टक्के वृद्धी झाली आहे. तिथेच जागतिक पातळीवर मात्र, यात ४१ टक्‍क्‍यांनी घट झाली असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची करविषयक धोरणे यास कारणीभूत असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

गेल्या वर्षी (२०१७) पहिल्या सहामाहीत जागतिक पातळीवरील एफडीआय अंदाजे ७९४ अब्ज डॉलर होता. हे प्रमाण चालू वर्षात घटून ४७० अब्ज डॉलरवर आल्याचा अंदाज आहे. यात आयर्लंड, स्वित्झर्लंड या देशांतील एफडीआयमध्ये अनुक्रमे ८१ व ७७ अब्ज डॉलरची घट झाली असून, काही विकसनशील देशांनाही याचा किंचितसा फटका बसल्याचे अहवालात नमूद आहे.   

हरित प्रकल्पांना पसंती 
गुंतवणूकदारांनी हरित प्रकल्पांना पसंती दिली आहे. तब्बल ४५४ अब्ज डॉलरची हरित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक झाली असून, यामध्ये ४२ टक्‍क्‍यांची वृद्धी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

इतर देशांमध्ये झालेली गुंतवणूक
    चीन -    ७०
    ब्रिटन -    ६५.५
    अमेरिका -    ४६.५
    नेदरलॅंड -    ४४.८
    ऑस्ट्रेलिया -    ३६.१
    सिंगापूर -    ३४.७ 
    ब्राझील -    २५.५ 
(आकडे अब्ज डॉलरमध्ये)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com