‘फेडरल रिझर्व्ह’चे दरवाढीचे सूतोवाच

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

वॉशिंग्टन: अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक "फेडरल रिझर्व्ह'च्या अधिकाऱ्यांनी नजीकच्या काळात व्याजरदवाढ करण्याचे सूतोवाच केले आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक "फेडरल रिझर्व्ह'च्या अधिकाऱ्यांनी नजीकच्या काळात व्याजरदवाढ करण्याचे सूतोवाच केले आहे.

"फेडरल रिझर्व्ह'च्या 31 जानेवारी ते 1 फेबुवारी यादरम्यान झालेल्या पतधोरण बैठकीचे तपशील जाहीर झाले आहेत. यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कर आणि खर्चाचे धोरण याबाबत अद्याप अनिश्‍चितता असल्याने "फेडरल रिझर्व्ह' सावध पवित्रा घेत आहे. ट्रम्प यांच्या आगामी धोरणाचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबाबतही मोठ्या प्रमाणात साशंकता आहे. डिसेंबरपासून अर्थव्यवस्थेची स्थिती आणि व्याजदर यात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे या वर्षभरात तीन वेळा व्याजदर वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मध्यम राहिल्यास काही किरकोळ प्रमाणात व्याजदरात वाढ होणे अपेक्षित आहे.

Web Title: federal reserve bank