"फेडरल रिझर्व्ह'ची सलग दुसऱ्यांदा व्याजदर कपात 

 "फेडरल रिझर्व्ह'ची सलग दुसऱ्यांदा व्याजदर कपात 

वॉशिंग्टन : अमेरिकेची केंद्रीय बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. "फेडरल' बॅंकेने बुधवारी (ता.18) व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली असून सध्याचा व्याजदर 1.75 टक्के ते 2 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेची घोडदौड मंदावली असल्याने विकासाला चालना देण्याच्यादृष्टीने बॅंकेने व्याजदर कपात केली आहे.

मात्र भविष्याबाबत अनिश्‍चितता कायम असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. 
गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिका-चीन या दोन बड्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापारी संघर्ष चिघळला आहे. त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची वाढ खुंटली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची वाट बिकट बनली आहे. त्याशिवाय व्यापारी संघर्षाने अनिश्‍चितता वाढवली असल्याचेही फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले.

दरम्यान, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी "फेडरल'ने व्याजदर कपात करावी, अशी मागणी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ट्रम्प यांनी "फेडरल'च्या धोरणकर्त्यांवर अनेकदा कठोर शब्दांत टीका केली होती. आजच्या व्याजदर कपातीनंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांना लक्ष्य केले.

जे. पॉवेल आणि फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा अपयशी ठरले. त्यांच्यामध्ये धैर्य नाही, समज नाही आणि दृष्टिकोनाचा अभाव असून असे नेतृत्व भयानक आहे,'' असे ट्विट करून ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हवर टीका केली आहे. यापूर्वी जुलैमध्ये फेडरल रिझर्व्हने 2008 च्या मंदीनंतर पहिल्यांदाच व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली होती. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com