Neil Chatterjee
Neil Chatterjee

‘एफईआरसी’च्या अध्यक्षपदी चटर्जी 

वॉशिंग्टन - ‘फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमिशन’च्या (एफईआरसी) अध्यक्षपदी भारतीय वंशाचे नील चटर्जी यांची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवड केली. ही संस्था अमेरिकेच्या पॉवर ग्रीडची देखरेख आणि अब्जावधी डॉलरच्या ऊर्जा प्रकल्पांबाबत निर्णय घेते. 

‘एफईआरसी’चे विद्यमान अध्यक्ष केविन मॅकलिंटायर हे २२ ऑक्‍टोबरला निवृत्त होत आहेत. त्यांची ऑगस्ट २०१७ मध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सध्या चटर्जी हे ‘एफईआरसी’च्या तीन आयुक्तांपैकी एक आहेत. चटर्जी यांनी याआधी सिनेटचे नेते मिच मॅककॉनेल यांचे ऊर्जा सल्लागार म्हणून काम पाहिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com