अर्थव्यवस्था ट्रॅकवर आणण्यासाठी मोदी सरकार या गोष्टींवर देणार भर; अर्थमंत्र्यांच्या घोषणांचा भडीमार

टीम ई-सकाळ
Thursday, 14 May 2020

भारतही त्याला अपवाद नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून कोरोना विषाणूला थोपवण्याच्या प्रयत्नामध्ये अर्थिक गणिते कोलमडली आहेत. व्यापार-उद्योग ठप्प झाल्यामुळे अर्थव्यवस्था तारण्याचे सरकारसमोर आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या युद्धजन्य परिस्थितीत आर्थिक लढ्यालाही सामोरे जावे लागत आहे. कोरोना विषाणूसारख्या जीवघेण्या रोगाशी लढा देण्यासाठी जगातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून कोरोना विषाणूला थोपवण्याच्या प्रयत्नामध्ये अर्थिक गणिते कोलमडली आहेत. व्यापार-उद्योग ठप्प झाल्यामुळे अर्थव्यवस्था तारण्याचे सरकारसमोर आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.  हे आव्हान पेलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत' अभियानाची घोषणा केली. यावेळी त्यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे आपतकालीन पॅकेजही जाहीर केले. 20 लाख कोटींच्या पॅकेजमध्ये कोणत्या क्षेत्राला कसा लाभ मिळणार याची माहिती अर्थमंत्रालयाकडून टप्प्याटप्याने देण्यात येत आहे. 

विशेष पॅकेजसंदर्भातील दुसऱ्या पत्रकार परिषदेत  शेतकरी आणि मजूरांना दिलासा देण्याचा प्रयत्न

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भातील दुसऱ्या पत्रकार परिषदेत आणखी काही तरतूदीची विभागणी कशी केली जाणार याची माहिती दिली. मार्च एप्रिलमध्ये सरकारने ज्या योजना लागू केल्या होत्या त्या योजनेची मुदत वाढवल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकरी वर्ग आणि मजूर वर्गातील लोकांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्रालयाकडून गुरुवारी करण्यात आल्या. यावेळी अर्थव्यवस्था पटरीवर आणण्यासाठी कशापद्धतीने प्रयत्न केले जाणार आहेत, याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.  

क्लारंटाईन झालेला पती आला घरी मग पत्नीने... 

#स्थलांतरित मजूरांसाठी मनरेगाअंतर्गत 10,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार

# या योजनेतील मजूरी 182 रुपयांवरून 200 रुपये करण्यात येणार

#नॅशनल फ्लोअर वेज संकल्पनेवर काम सुरू 

#लेबर कोड बनवण्यासंदर्भातील काम सुरु करुन त्याला गती देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार 

#आंतरराज्यीय अस्थलातंरित मजूरांची व्याख्या बदलणार

#किमान मजूरी युनिव्हर्सल बनण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत

#सर्व मजूरांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प

#मजूरांच्या सुरक्षा आणि आरोग्यासाठी कायदेशीर तरतूद करणार

#असंघटीत क्षेत्रातील मजूरांसाठी सोशल सिक्युरिटी फंडची तरतूद करणार

#10 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीत ईएसआयसीची सुविधा बंधनकारक होणार

#कमी व्याजदराची कर्ज सरकार शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार

#दोन लाख कोटी रुपयांची तरतदू कमी व्याजदराच्या कर्जासाठी केली आहे.

#मत्सपापन, पशूपालन करणाऱ्यांनादेखील किसान क्रेडिट कार्डचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार

यंदा टक्का नाहीच; फक्त 33 टक्के निधीच येणार खर्च करता
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finance minister nirmala sitharaman says upcoming Modi Government economy poliocy