अर्थ मंत्रालयाने केला GST मध्ये बदल! 40 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या व्यावसायिकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 August 2020

केंद्र सरकारने आज वस्तू आणि सेवा कर (GST- Goods and Services Tax) बद्दल आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  ज्या व्यापारी किंवा व्यावसायिकांचं वार्षिक उत्पन्न 40 लाखांपर्यंत आहे, त्यांना आता GST मधून सूट मिळणार आहे. याअगोदर ही मर्यादा 20 लाख होती. यामुळे देशातील व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने आज वस्तू आणि सेवा कर (GST- Goods and Services Tax) बद्दल आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  ज्या व्यापारी किंवा व्यावसायिकांचं वार्षिक उत्पन्न 40 लाखांपर्यंत आहे, त्यांना आता GST मधून सूट मिळणार आहे. याअगोदर ही मर्यादा 20 लाख होती. यामुळे देशातील व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच ज्या व्यापाऱ्यांचं उत्पन्न 1.5 कोटी आहे, ते व्यापारी किंवा व्यायसायिक आता ' कंपोजिशन योजने'चा (Composition Scheme ) पर्याय निवडू शकतात. याआधी ती मर्यादा 75 लाख होती. या योजनेची निवड केली तर, व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नावर फक्त केवळ 1 टक्का कर द्यावा लागेल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) ट्विट करत ही माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्यावेळेस GST देशात लागू केला होता, त्यावेळेस GSTअंतर्गत कर भरणाऱ्यांची संख्या 65 लाख होती. आज हा आकडा वाढून 1 कोटी 24 लाख झाला आहे. भारतात GST ही करप्रणाली  1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आली होती. त्यावेळेस अरुण जेटली हे केंद्रीय अर्थमंत्री होते. "आज आम्ही अरुण जेटली यांना स्मरण करीत आहोत. कारण त्यांनी जीएसटीच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भविष्यात  GST हे भारतीय कर प्रणालीतील एक ऐतिहासिक सुधारणा ठरेल". अशी माहिती अर्थ मंत्रालयाने  ट्विट करून दिली आहे.

देशात GST सध्या पेट्रोलियम पदार्थ आणि अल्कोहोल वगळता जवळजवळ प्रत्येक वस्तूवर आकारला जातो. सोमवारी अर्थ मंत्रालयाने माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अनेक ट्विट करून या नवीन बदलांबद्दल माहिती दिली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की जीएसटीपूर्वी मूल्यवर्धित कर (व्हॅट), उत्पादन शुल्क व विक्री कर भरावा लागला होता.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: finance ministry anounce new changes in gst