
या राशीच्या व्यक्तींना 10 नोव्हेंबर 2019 पासूनचा कालखंड हा अत्यंत चांगला आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.
व्यवसाय, कारखानदारी, उद्योगधंदा या दृष्टीने या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. व्यवसायातील उलाढाल वाढेल. व्यवसायातील कामकाजाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात काही काळापासून रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
संपूर्ण वर्षभर गुरू अनुकूल आहे. हा गुरू सुसंधी मिळण्याच्यादृष्टीने, व्यवसायवाढीच्यादृष्टीने आणि आर्थिक लाभाच्यादृष्टीने चांगला आहे. 24 जानेवारी 2020 रोजी सातव्या स्थानात जाणारा शनी हाही चांगला आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत सुयश लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
- मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभासाठी अनुकूल काळ; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य
मनासारखी आर्थिक आवक राहील. नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. नोकरीत आपली प्रगती होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण मिळेल. आपणास शत्रुपीडा नाही. विरोधकांवर मात करण्याच्यादृष्टीने 19 सप्टेंबर 2020 पर्यंतचा कालखंड चांगला आहे. काहींना पगारवाढीची शक्यता आहे.
- वृषभ राशीला गुंतवणुकीसाठी वर्ष चांगले; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य
महिलांना या वर्षात प्रचंड आर्थिक लाभ होणार आहेत. शेअर्समध्ये व व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. तुम्ही नोकरीत असाल तर बढती मिळेल. समाजकारण, राजकारणात असाल तर निवडून याल. गुंतवणुकीसाठी 24 जानेवारी 2020 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. त्यानंतर गुंतवणूक करताना फार विचार करावा.
- कसं असेल मेष राशीचं आर्थिक वर्ष?
थोडक्यात, या राशीच्या व्यक्तींना 10 नोव्हेंबर 2019 पासूनचा कालखंड हा अत्यंत चांगला आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. बढती निश्चित मिळणार आहे. आपण अधिकारपदावर असाल तर कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभणार आहे. कामगार संघटनेच्या निवडणुका लढविणार असाल तर अशा निवडणुकीत बाजी माराल.