मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभासाठी अनुकूल काळ; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

विशेषत: 28 मार्च 2020 पर्यंतचा कालखंड नोकरीमध्ये सुसंधी मिळण्याच्या दृष्टीने, नवे हितसंबंध निर्माण होण्याच्या दृष्टीने, सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने चांगला आहे.

मिथुन  

व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदा, कारखानदारी या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना आगामी वर्ष चांगले जाणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. व्यवसायवाढीकडे लक्ष देऊ शकाल.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Image may contain: outdoor

तुमच्या व्यवसायाच्या नव्या शाखा निर्माण करण्यासाठीही वर्ष चांगले आहे. संपूर्ण वर्षभर व्यवसायाच्या दृष्टीने व आर्थिक लाभाच्या दृष्टीने गुरू अनुकूल आहे. 24 जानेवारी 2020 रोजी आठव्या स्थानात जाणारा शनी हा संमिश्र स्वरूपाचा आहे. व्यवसायात वाढ होणार आहे. आर्थिक लाभाचेही प्रमाण चांगले राहणार आहे. आगामी वर्षाकडे आशेने पाहावयास हरकत नाही.

- कसं असेल मेष राशीचं आर्थिक वर्ष?

No photo description available.

नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. विशेषत: 28 मार्च 2020 पर्यंतचा कालखंड नोकरीमध्ये सुसंधी मिळण्याच्या दृष्टीने, नवे हितसंबंध निर्माण होण्याच्या दृष्टीने, सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने चांगला आहे. नोकरीमध्ये काहींना बढतीची शक्‍यता आहे. व्यवसाय करणाऱ्या महिलांची भरभराट होईल. नोकरीत असाल तर बढती मिळेल.

- वृषभ राशीला गुंतवणुकीसाठी वर्ष चांगले; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

Image may contain: one or more people

आर्थिक लाभ भरपूर होणार आहेत. प्रत्यक्ष गुंतवणुकीपेक्षा तुमचे निर्णय योग्य ठरणार आहेत. हे वर्ष बौद्धिकदृष्ट्या चांगले आहे. प्रत्यक्ष गुंतवणुकीला फार यशदायक आहे, असे नाही. फक्‍त आपले निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत.

- मंदीच्या काळात 'इथे' मिळतील भरपूर 'रिटर्न्स'

No photo description available.

थोडक्‍यात, या राशीच्या व्यक्‍तींना हे संपूर्ण वर्ष अत्यंत प्रगतीचे, यशाचे, सफलतेचे जाणार आहे. मात्र, 24 जानेवारी 2020 नंतरच्या कालखंडात आर्थिक क्षेत्रात धाडस शक्‍यतो विचार करून करावे. शेअर्समध्ये किंवा इतर कोणत्याही आर्थिक क्षेत्रात साधकबाधक व चौफेर विचार केल्याशिवाय धाडस नको. नोकरीत तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव राहणार आहे. बढतीची व पगारवाढीची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial horoscope for Gemini information in marathi