सिंह राशीच्या लोकांचे अंदाज अचूक ठरतील; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

सिंह राशीच्या व्यक्‍तींना संपूर्ण वर्षभर गुरू अनुकूल आहे. 4 नोव्हेंबरपूर्वीचा गुरू हा चौथा असला तरी तो व्यवसायाला चांगला आहे आणि 4 नोव्हेंबरनंतरचा गुरू हा अधिक चांगला आहे.

सिंह : 

या राशीच्या व्यक्‍तींना व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने 5 नोव्हेंबरपर्यंतचा व 29 मार्च 2020 ते 28 जून 2020 हा कालखंड जास्त चांगला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या कालखंडामध्ये व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. महत्त्वाची कामे धाडसाने करू शकाल. उर्वरित कालखंडामध्ये नवे हितसंबंध निर्माण करू शकाल व त्याचा फायदा तुम्हाला व्यवसायवाढीसाठी होईल.

- कसं असेल मेष राशीचं आर्थिक वर्ष?

No photo description available.

सिंह राशीच्या व्यक्‍तींना संपूर्ण वर्षभर गुरू अनुकूल आहे. 4 नोव्हेंबरपूर्वीचा गुरू हा चौथा असला तरी तो व्यवसायाला चांगला आहे आणि 4 नोव्हेंबरनंतरचा गुरू हा अधिक चांगला आहे. शनी मात्र थोडासा प्रतिकूल आहे. त्याची फार काळजी करण्याचे कारण नाही. 4 नोव्हेंबरनंतरचे तुमचे व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. त्याचा व्यवसायाच्यादृष्टीने फायदा होईल. शिवाय राहूही लाभात आहे व तो मिथुन राशीत आहे. तोही अनुकूल आहे.

- वृषभ राशीला गुंतवणुकीसाठी वर्ष चांगले; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

Image may contain: one or more people

या राशीच्या व्यक्‍तींना नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. नोकरीत असणाऱ्या विरोधकांच्या कारवायांवर मात करण्याच्यादृष्टीने 4 जानेवारी 2020 नंतरचा कालखंड जास्त चांगला आहे. नोकरीत आपला परिचय वाढणार आहे. काहींवरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. महिलांना हे वर्ष संततिसौख्यासाठी चांगले आहे. आरोग्यालाही चांगले आहे. आपण ज्या क्षेत्रात आहात, त्या क्षेत्रात नवी संधी मिळेल, प्रसिद्धी मिळेल. यावर्षी आपणाला अनेकांचे सहकार्य लाभेल. तीर्थयात्रेचे, परदेश प्रवासाचे योग येतील. गुंतवणुकीसाठी हे वर्ष सर्वसामान्य आहे.

- मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभासाठी अनुकूल काळ; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

Image may contain: outdoor

थोडक्‍यात, या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष आरोग्य व मानसिकदृष्टीने चांगले आहे. यावर्षी आपल्याकडून मार्गदर्शन घेतले जाईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ मध्यम प्रमाणात राहतील. शत्रुपीडा नाही. विरोधकांवर मात कराल. वैचारिक प्रगल्भता वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. भाग्यकारक अशी संधी लाभेल, प्रसिद्धी लाभेल.

- कर्क राशीला मनासारखी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial horoscope for leo information in marathi