वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

प्रा. रमणलाल शहा
Monday, 25 November 2019

नोकरीमध्ये हे वर्ष अत्यंत भरभराटीचे आहे. यशाचे आहे, सफलतेचे आहे. आपल्या अपेक्षेपेक्षा यावर्षी नियती आपल्या पदरात जास्त दान टाकणार आहे.

वृश्‍चिक : 

व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, व्यापर, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. विशेषत: 5 नोव्हेंबर 2019 ते 28 मार्च 2020 व 29 जून 2020 ते 15 नोव्हेंबर 2020 हा कालखंड ढोबळमानाने व्यवसायामध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीने, व्यवसायातील आर्थिक लाभ वाढण्याच्या दृष्टीने, व्यवसायाची नवीन शाखा निर्माण करण्याच्या दृष्टीने चांगला आहे.

- कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात यश; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य!

Image may contain: outdoor

या वर्षी आपण सातत्याने कार्यरत राहाल. आपल्या आशाआकांक्षा पूर्ण होणार आहेत. या राशीच्या व्यक्‍तींना 4 नोव्हेंबरपूर्वीचा कालखंड निर्णय घेण्यासाठी चांगला आहे, तर त्यानंतरचा कालखंड आर्थिक लाभाला अत्यंत चांगला आहे. या राशीच्या व्यक्‍तींनी या वर्षी धाडसाने आर्थिक व्यवहार करायला हरकत नाहीत. कारण, आर्थिक बाबतीत हे वर्ष खूपच चांगले आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करावे.

- सिंह राशीच्या लोकांचे अंदाज अचूक ठरतील; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

No photo description available.

नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. काहींना बढतीची शक्‍यता आहे, तर काहींची पगारवाढ होण्याची शक्‍यता आहे. महिलांसाठी हे वर्ष अत्यंत भरभराटीचे, आर्थिक लाभाचे व प्रचंड फायद्याचे ठरणार आहे. शेअर्समध्ये, व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. सार्वजनिक जीवनात, राजकारणात, निवडणुकीत यश मिळणार आहे. गुंतवणुकीसाठी 24 जानेवारी 2020 पूर्वीचा कालखंड चांगला आहे.

- कर्क राशीला मनासारखी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

No photo description available.

थोडक्‍यात, नोकरीमध्ये हे वर्ष अत्यंत भरभराटीचे आहे. यशाचे आहे, सफलतेचे आहे. आपल्या अपेक्षेपेक्षा यावर्षी नियती आपल्या पदरात जास्त दान टाकणार आहे. बढती व पगारवाढ होईल. आपल्या अधिकारात वाढ होईल. आपली साडेसाती 24 जानेवारी 2020 पासून संपणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत जो त्रास झाला, ज्या अडचणी आल्या, त्या आता सर्व संपणार आहेत. 

- मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभासाठी अनुकूल काळ; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial horoscope for Libra information in marathi