मकर : नवी दिशा, मार्ग सापडेल; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

प्रा. रमणलाल शहा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

नोकरी संदर्भातील महत्त्वाची कामे शक्‍यतो 27 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबर 2019 व 29 मार्च ते 28 जून 2020 या कालखंडामध्ये उरकून घ्यावीत.

मकर : 

व्यवसाय, उद्योगधंदा, व्यापार, कारखानदारी या दृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. व्यवसायामध्ये आपला परिचय वाढेल, नवीन हितसंबंध निर्माण होतील. परंतु, कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Image may contain: one or more people

व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. कोणतेही निर्णय घाईगडबडीने घेऊ नयेत. कामे विलंबाने होण्याची शक्‍यता आहे. व्यवसायातील मोठे धाडस टाळावे. या राशीच्या व्यक्‍तींना फक्‍त 4 नोव्हेंबरपूर्वीचा कालखंड चांगला आहे. महत्त्वाचे व्यवहार यापूर्वी करावेत. त्यानंतर गुरू बाराव्या स्थानात राहणार आहे.

- कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात यश; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य!

No photo description available.

25 जानेवारी 2020 नंतर शनी प्रथमस्थानात येणार आहे. तो चांगला आहे. मात्र, मकर राशीलासुद्धा साडेसाती सुरू आहे. त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. नोकरी संदर्भातील महत्त्वाची कामे शक्‍यतो 27 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबर 2019 व 29 मार्च ते 28 जून 2020 या कालखंडामध्ये उरकून घ्यावीत.

- वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

Image may contain: 3 people, people sitting, table and indoor

नोकरीमध्ये कोणतेही महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या संमतीशिवाय घेऊ नयेत. सध्या आपला साडेसातीचा कालखंड चालू आहे. त्यामुळे वादविवादात शांत व संयमी राहावे. महिलांना हे वर्ष सामान्य आहे. 29 मार्च ते 20 जून 2020 हा कालखंड वैवाहिक सौख्य, आरोग्य, संततिसौख्याला; तसेच विवाहेच्छू मुलींच्या विवाहाला लाभदायक आहेत.

- धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

No photo description available.

गुंतवणुकीला संपूर्ण वर्ष चांगले आहे. 4 नोव्हेंबर 2019 पासून गुरू बाराव्या स्थानात जात आहे. हे फारसे लाभदायक नाही. फक्‍त शनी 24 जानेवारी 2020 पासून पहिल्या स्थानात येत आहे. त्यामुळे आपली गेली दोन-अडीच वर्षे जी आर्थिक कुचंबणा होत होती, ती आता संपणार आहे. शिवाय 29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. या कालखंडात एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial horoscope for Sagittarius information in marathi