धनु : धाडस करताना जागरूक राहा; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

प्रा. रमणलाल शहा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष चांगले जाणार आहे. विशेषत: 4 जानेवारी 2019 नंतरचा कालखंडा नोकरीत समाधानकारक राहील.

धनू : 

व्यवसाय, व्यापार, उद्योग, कारखानदारी, धंदा यादृष्टीने या राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष 24 जानेवारी 2020 नंतर चांगले ठरणार आहे. यशदायक ठरणार आहे. साडेसातीचा कालखंड चालू असल्यामुळे व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

व्यवसायातील कटकटी 24 जानेवारीनंतर कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. तरीही कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नयेत. या राशीच्या व्यक्‍तींना 4 नोव्हेंबरनंतरचा कालखंड निर्णय घेण्यासाठी चांगला आहे आणि आर्थिक लाभाला 24 जानेवारी 2020 नंतरचा कालखंड चांगला आहे. मात्र, या राशीच्या व्यक्‍तींना साडेसाती चालू आहे. तेव्हा व्यवहार करताना, धाडस करताना जागरूक राहावयास हवे.

- वृश्चिक राशीची भरभराट; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष चांगले जाणार आहे. विशेषत: 4 जानेवारी 2019 नंतरचा कालखंडा नोकरीत समाधानकारक राहील. मानसिक ताणतणाव कमी होतील. तुमच्यावरील जबाबदारीचे प्रमाण 24 जानेवारी 2020 नंतर कमी होईल.

No photo description available.

- आयुर्विमा योजना होणार अधिक ग्राहकाभिमुख

महिलांना आरोग्य, वैवाहिक सौख्याला चांगले वर्ष आहे. संततिसौख्यालाही चांगले आहे. विवाहेच्छू मुलींचे विवाह जमणार आहेत. घरात मंगलकार्य होणार आहे. साडेसाती चालू आहे, याचे स्मरण ठेवावे. गुंतवणुकीसाठी हे वर्ष चांगले आहे. 24 जानेवारी 2020 रोजी शनी धनस्थानात जात आहे. त्याचा आर्थिकदृष्ट्या फायदा होईल.

- सिंह राशीच्या लोकांचे अंदाज अचूक ठरतील; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य

29 मार्च ते 29 जून 2020 या कालखंडात आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर होतील. जे काही आर्थिक धाडस करायचे असेल, ते वरील कालखंडात करावे.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial horoscope for Scorpio information in marathi