कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात यश; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य!

प्राचार्य रमणलाल शहा
Sunday, 24 November 2019

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी 19 सप्टेंबरपर्यंतचा कालखंड हा नोकरीत बढतीच्यादृष्टीने चांगला आहे.

कन्या : 

या राशीच्या व्यक्‍तींना व्यवसाय, उद्योग यादृष्टीने हे वर्ष चांगले ठरणार आहे. व्यवसायातील अडचणी किंवा बरेच दिवसांपासून रखडलेली कामे, रखडलेले निर्णय 24 जानेवारी 2020 नंतर घेऊ शकाल.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

No photo description available.

व्यवसायात नवे तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. व्यवसायाची व्याप्ती वाढवू शकाल. गुरू, शनी व राहू हे सर्व अनुकूल आहेत. व्यवसायावर तुमची पकड राहील. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. व्यवसाय वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण कमी राहील, तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या हे वर्ष अनुकूल आहे.

- वृषभ राशीला गुंतवणुकीसाठी वर्ष चांगले; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

No photo description available.

नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष चांगले ठरणार आहे. आपल्यादृष्टीने पोषक वातावरण राहील. काहींची बढती होण्याची शक्‍यता आहे. नोकरीत केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. विशेषत: 4 नोव्हेंबर 2019 नंतरचा कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना लाभदायक व यशदायक आहे, बढतीला चांगला आहे. ज्यांना बदली हवी आहे, त्यांनी प्रयत्न करावेत.

- कर्क राशीला मनासारखी आर्थिक आवक; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

Image may contain: one or more people

महिलांचा व्यवसाय असेल, तर त्या व्यवसायात उलाढाल वाढणार आहे. नोकरीत असाल तर बढती मिळणार आहे. प्रतिष्ठा मिळणार आहे. निवडणुकीत यश मिळेल. गुंतवणुकीसाठी संपूर्ण वर्ष चांगले आहे.

- मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभासाठी अनुकूल काळ; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

थोडक्‍यात, या राशीच्या व्यक्तींसाठी 19 सप्टेंबरपर्यंतचा कालखंड हा नोकरीत बढतीच्यादृष्टीने चांगला आहे. या कालखंडापर्यंत तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. अधिकारपद मिळेल. जबाबदारीचे पद मिळेल. तुम्ही आपल्या कार्याचा व कर्तृत्त्वाचा ठसा उमटवू शकाल.

- सिंह राशीच्या लोकांचे अंदाज अचूक ठरतील; जाणून घ्या आर्थिक राशिभविष्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial Horoscope for Virgo information in marathi