‘फिच’कडून भारताचे पतमानांकन ‘जैसे थे’

Fitch-Ratings
Fitch-Ratings

नवी दिल्ली - भारताचे पतमानांकन ‘बीबीबी’ या गुंतवणुकीच्या सर्वांत खालील स्तरावर ‘फिच रेटिंग्ज’ या पतमानांकन संस्थेने कायम ठेवले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ स्थिर राहील, असा अंदाज ‘फिच रेटिंग्ज’ने व्यक्त केला आहे. ‘फिच रेटिंग्ज’ने म्हटले आहे, की भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) मार्च २०१९ अखेर संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षात ७.८ टक्के राहील.

मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ते ६.७ टक्के होते. पुढील दोन आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादनात घसरण होऊन ते ७.३ टक्‍क्‍यांवर येईल. देशाची बिघडत चाललेली आर्थिक स्थिती, वित्तीय क्षेत्राचा खराब ताळेबंद आणि जागतिक पातळीवर वाढलेले खनिज तेलाचे भाव यांमुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कमी राहील, असा अंदाज आहे. देशात सूक्ष्म आर्थिक पातळीवर जोखीम वाढली असून, कर्ज वितरणात घसरण होण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com