पुढील आठवड्यात पाच कंपन्या ‘एफअँडओ’मध्ये सामील

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

नवी दिल्ली: राष्ट्रीय शेअर बाजारात फ्युचर्स अँड ऑप्शन्स(एफअँडओ) विभागात पाच नव्या कंपन्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स, मणप्पुरम फायनान्स, रेपको होम फायनान्स आणि श्रेई इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश आहे. गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये 30 जूनपासून व्यवहार करता येईल.

गेल्या आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराने सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरला डेरिव्हेटिव्ह अर्थात 'फ्युचर्स आणि ऑप्शन्स' व्यवहारातून (एफ अँड ओ) वगळण्याचे ठरविले होते. बाजारात कंपनीच्या सध्याच्या करारांची मुदत संपुष्टात आल्यानंतर कोणतेही नवे करार होणार नाहीत. परंतु, जून, जुलै आणि ऑगस्टमधील करारांचे व्यवहार त्यांची मुदत संपेपर्यंत सुरु राहतील.

Web Title: Five companies join F & O next week