फ्लिपकार्टमधून बिन्नी बन्सल बाहेर

वृत्तसंस्था
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

नवी दिल्ली - ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

बन्सल यांच्यावरील गैरवर्तणुकीच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे ‘वॉलमार्ट’ने सांगितले. बन्सल यांनी मात्र ही बाब चुकीचे असल्याचे म्हटले आहे. बन्सल यांचा राजीनामा लगेचच स्वीकारण्यात आल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे. फ्लिपकार्टची मालकी असलेल्या वॉलमार्टने याबाबत निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यात बिन्नी यांच्या गैरकारभाराचे वा गैरकृत्याचे पुरावे मिळालेले नाहीत, असे म्हटले आहे. परंतु बिन्नी यांच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव होता, त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. 

बिन्नी यांचा उत्तराधिकारी अद्याप ठरलेला नाही. कल्याण कृष्णमूर्ती फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतील. मिंत्रा आणि जबाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनंत नारायण हे कायम असतील, ते आता कृष्णमूर्ती यांना आपला अहवाल सादर करतील. तर समीर निगम हे फोन पेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कायम असतील. कल्याण कृष्णमूर्ती आणि समीर निगम हे दोघे संचालक मंडळाला उत्तरदायी असतील.

वॉलमार्टने या वर्षी मे महिन्यात फ्लिपकार्टला १.०५ लाख कोटी रुपयांना विकत घेतले होते. वॉलमार्टचा फ्लिपकार्टमध्ये ७७ टक्के हिस्सा आहे. या व्यवहारत फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांना त्यांच्याकडील ५.५ टक्के हिस्सा विकावा लागला होता. फ्लिपकार्टमधून आता दोन्हीही संस्थापक बाहेर पडले आहेत. सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी २००७मध्ये बंगळूरमध्ये फ्लिपकार्टची स्थापना केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flipkart binny bansal Release