फ्लिपकार्टचा ‘आयपीओ’ चार वर्षांत येणार - वॉलमार्ट 

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

मुंबई : प्लिपकार्ट कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) चार वर्षांत केली जाईल, अशी माहिती वॉलमार्टने अमेरिकेतील भांडवली बाजार नियामकांसमोर दिली आहे. वॉलमार्टने १६ अब्ज डॉलरला फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. फ्लिपकार्ट कंपनी पुढील चार वर्षांत शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात येईल, अशी माहिती वॉलमार्टने अमेरिकेतील भांडवली बाजार नियंत्रक संस्थेला दिली आहे.

आयपीओसाठी फ्लिपकार्टमधील सुमारे ६० टक्के हिस्सा ताब्यात असलेल्या छोट्या गुंतवणूकदारांना एकत्रित निर्णय घ्यावा लागणार आहे. वॉलमार्टने गुंतविलेल्या निधीएवढ्याच रकमेचे उद्दिष्ट आयपीओमधून निधी उभारणीचे असेल, असे वॉलमार्टने म्हटले आहे.  फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा वॉलमार्टने ताब्यात घेतला आहे. कंपनीतील उरलेला हिस्सा फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, चीनमधील टेनसेंट होल्डिंग्ज, अमेरिकेतील टायगर ग्लोबल मॅनेजमेंट आणि मायक्रोसॉफ्टकडे आहे. या व्यवहारानंतर फ्लिपकार्टचे भांडवलीमूल्य २१ अब्ज डॉलरवर गेले आहे. भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातील हा सर्वांत मोठा व्यवहार ठरला आहे.

Web Title: Flipkart IPO will come in four years