Budget 2020 : देशात 2025 पर्यंत 100 नवी विमानतळं!

टीम ई-सकाळ
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

देशात 2025 पर्यंत 100 नवे विमानतळ सुरू केले जाणार आहेत. देशात एकूण 9 हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर लवकरच तयार करण्यात येणार.

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना पायाभूत सुविधांवर सरकार भर देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. रस्ते, जल वाहतुकीबरोबरच हवाई वाहतुकीच्या पायाभूत सुविधा वाढवण्याची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात 6,500 पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम सुरू असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. देशात सध्या 6,500 पायाभूत सुविधा (नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर) प्रकल्पांवर एकतर काम सुरू आहे याती काही प्रकल्पांचे नियोजन झालेले आहे.

Image may contain: 1 person, text that says "सकाळ पायाभूत सुविधा BUDGET 2020-21 पायाभूत 2024 पर्यंत नवी शंभर विमानतळे उभारण्यात येणार पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार सागरी किनारी दोन हजार रस्ते उभारणार आर्थिक दळणवळण वाढीसाठी नद्यांचा वापर होणार वीज क्षेत्रासाठी 22 हजार कोटींची तरतूद बंगळूर, दिल्ली-मुंबई दरम्यान एक्स्प्रेस हायवे सुरु करणार 2024 पर्यंत 6 लाख किमीचे रस्ते बनविणार eSakal.com"

- Budget 2020:बजेट समजणं किटकट वाटतंय? 'हे' 25 मुद्दे समजून घ्या!

एनसीडीसीद्वारे देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील कौशल्य विकास करण्यासाठी मदत केली जाणार आहे. देशात 2025 पर्यंत 100 नवे विमानतळ सुरू केले जाणार आहेत. देशात एकूण 9 हजार किलोमीटरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर लवकरच तयार करण्यात येणार. चेन्नई-बंगळूरू एक्सप्रेसवेचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. 

- Budget 2020 : नेहरूंनी आणला देशात गिफ्ट टॅक्स!

अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधांचे ठळक मुद्दे :
- पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार
- सागरी किनारी दोन हजार किलोमीटरचे रस्ते उभारणार
- आर्थिक दळणवळण वाढीसाठी नद्यांचा वापर होणार
- वीज क्षेत्रासाठी 22 हजार कोटींची तरतूद
- 2024 पर्यंत नवी शंभर विमानतळे उभारण्यात येणार
- चेन्नई-बंगळूर, दिल्ली-मुंबई दरम्यान एक्स्प्रेस हायवे सुरु करणार
- 2024 पर्यंत 6 लाख किमीचे रस्ते बनविणार

- Budget 2020:आणि रेल्वे अर्थसंकल्पच बंद झाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FM Nirmala Sitharaman says India to get 100 more airports and more Tejas type trains