परदेशातील बेकायदा मालमत्ता प्राप्तिकरच्या रडारवर

पीटीआय
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - विदेशात बेकायदा मालमत्ता खरेदी करणारे देशातील असंख्य नागरिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून, यासाठी एक मोठी मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी आज दिली. 

नवी दिल्ली - विदेशात बेकायदा मालमत्ता खरेदी करणारे देशातील असंख्य नागरिक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून, यासाठी एक मोठी मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्यांनी आज दिली. 

विदेशातील बॅंकांमध्ये बेकायदा ठेवलेल्या ठेवी, तसेच मालमत्ता धारण करणाऱ्या भारतातील नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ज्या-त्या देशातील प्राप्तिकर विभागांची मदत घेतली जाणार आहे. दोषी आढणाऱ्यांवर काळ्या पैशाविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचे सूतोवाचही प्राप्तिकर विभागाने केले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांनी याला दुजोरा दिला असून, अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दर्शविला.

अक्षेपार्ह व्यवहार करणाऱ्या अनेक करदात्यांना नोटिसा पाठवून खुलासा करण्याचे आदेश निर्देश देण्यात आल्याची माहितीही प्राप्तिकरच्या 
अधिकाऱ्यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Foreign Illegal Property on Income Tax Radar