परकीय चलन गंगाजळीत घट

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई: भारताच्या परकी चलन गंगाजळीत 17 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात 56.8 दशलक्ष डॉलरची घट होऊन ती 362.73 अब्ज डॉलरवर आली आहे. परकी चलन गंगाजळीत त्याआधीच्या आठवड्यातही घसरण नोंदविण्यात आली होती.

मुंबई: भारताच्या परकी चलन गंगाजळीत 17 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात 56.8 दशलक्ष डॉलरची घट होऊन ती 362.73 अब्ज डॉलरवर आली आहे. परकी चलन गंगाजळीत त्याआधीच्या आठवड्यातही घसरण नोंदविण्यात आली होती.

परकी चलन मालमत्तेत घसरण झाल्याने परकी चलन गंगाजळीत घट झाली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी दिली. फेब्रुवारीमधील दुसऱ्या आठवड्यात परकी गंगाजळीत 360.9 दशलक्ष डॉलरची घसरण होऊन ती 362.78 अब्ज डॉलरवर आली होती. परकी चलन मालमत्तेत 17 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात 59.1 दशलक्ष डॉलरची घसरण होऊन ती 339.72 अब्ज डॉलरवर आली आहे. सोन्याचा साठा मात्र, कायम असून, तो 19.248 अब्ज डॉलरचा आहे, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

Web Title: foreign investment less