मोफत 'इनकमिंग कॉल' होणार बंद? 

वृत्तसंस्था
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून लवकरच मोबाईल धारकांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे. जिओच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल सारख्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. परिणामी आता कंपन्यांनी 'इनकमिंग कॉल'साठी शुल्क आकारण्याची तयारी सुरु केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इनकमिंग कॉलची मोफत सुविधा कंपन्यांकडून पुरविली जाते. मात्र आता मोबाईल धारकांना इनकमिंग कॉलसाठी महिन्याकाठी (28 दिवस) काही शुल्क मोजावे लागण्याची शक्यता आहे. 

 सुरुवातीला कंपन्यांकडून मोबाईलवर येणाऱ्या इनकमिंगसाठी देखील शुल्क आकारले जात होते. मात्र जिओने डेटा आणि दरयुद्ध छेडल्यानंतर इतर कंपन्यांनी देखील कॉल दर कमी केले. परिणामी कंपन्यांच्या नफ्यात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे.  स्वस्त इंटरनेट प्लॅनमुळे मोबाईल धारकांचा वापर वाढल्यामुळे इंटरनेट पॅकमुळेच आऊटगोइंग कॉलही स्वस्त किंवा काही कंपन्यांनी ठराविक कॉल मोफत सुविधा देऊ केली. आता मात्र  'इनकमिंग कॉल'साठी पैसे द्यावे लागण्याची शक्यता आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free incoming calls facility may stop soon