मतदान संपताच इंधन दरवाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 मे 2018

नवी दिल्ली - जागतिक पातळीवर क्रूड तेलाच्या किमती वाढत असतानाही सरकारने गेले सुमारे १९ दिवस रोखून धरलेल्या देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आज सकाळी सहापासून उसळी मारली. पेट्रोल प्रतिलिटर १७, तर डिझेल २१ पैशांनी महागले. 

जागतिक पातळीवर कच्चे तेल कडाडले आहे. तरीही कर्नाटकात निघणाऱ्या मतांच्या पिकाच्या आशेने दिल्लीतून पेट्रोलच्या किमती स्थिर ठेवल्या गेल्या होत्या. कर्नाटकाचे मतदान पार पडताच या किमतींनी उसळी घेतली आहे. सध्याचे पेट्रोलचे दर ५६ महिन्यांतील विक्रमी  आहेत.    

पेट्रोल व डिझेलची दरवाढ पुन्हा सुरू. इंधनावर आणखी कर आणि त्याचा ग्राहकांवर आणखी बोजा. कर्नाटक निवडणूक हा केवळ एक मध्यांतर होता. 
- पी. चिदंबरम, ज्येष्ठ काँग्रेस नेते

नवे दर (अनुक्रमे पेट्रोल-डिझेल)
दिल्ली     ७४.८०    ६६.१४
मुंबई     ८२.६५    ७०.४३
पुणे    82.65     69.45
चेन्नई      ७७.६१     ६९.७९
कोलकता      ७७. ५०     ६८.८० 
(आकडे रुपयांत, प्रतिलिटर)

Web Title: Fuel price hike