इंधन दरवाढीचा भडका 

पीटीआय
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली - देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने ९१ रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे. 

नवी दिल्ली - देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने ९१ रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे. 

पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर २४ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३० पैसे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८३.७३ रुपये आणि डिझेलचा दर ७५.०९ या विक्रमी पातळीवर पोचला. मुंबईत पेट्रोलचा दर आज ९१.०८ रुपये आणि डिझेल ७९.७२ रुपयांवर गेले. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही आजपासून वाढ झाली. अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात २.८९ रुपये वाढ करण्यात आली असून, तो ५०२ रुपयांवर गेला आहे. याचबरोबर विनाअंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात ५९ रुपये वाढ करण्यात आली असून, तो ८७९ रुपयांवर गेला आहे. 

अंशदानित गॅस सिलिंडर 
मे : ४९१.२१ रुपये 
ऑक्‍टोबर : ५०२.४० रुपये 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel price hike