इंधन चार रुपयांनी महागणार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

नवी दिल्ली - खनिज तेलाचे वाढते भाव आणि चलन बाजारात डॉलरसमोर रुपयाचे अवमूल्यन यामुळे तेल वितरक कंपन्यांवरील आर्थिक बोजा वाढला आहे. यामुळे नफ्याचे प्रमाण कायम राखण्यासाठी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर किमान चार रुपयांची वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेल गुरुवारी प्रतिलिटर २२ पैशांनी महागले. 

कर्नाटकातील निवडणुकीमुळे २४ एप्रिलपासून १९ दिवस देशात इंधन दरवाढ झाली नाही. मात्र, याच कालावधीत आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांचा नफा प्रतिलिटर ३१ पैसे इतका कमी झाला आहे, ‘आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज’ने म्हटले आहे. जागतिक बाजारातील भडकलेले खनिज तेल आणि चलन विनिमयामुळे कंपन्यांना किमान ५०० कोटींचे नुकसान झाले असण्याची शक्‍यता आहे. ही भरपाई करण्यासाठी कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलमध्ये किमान चार रुपयांची वाढ होण्याची  शक्‍यता आहे. 

Web Title: Fuel prices may rise by Rs 4