इंधनदरातील कपात सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - इंधनदरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने सुरू असलेल्या कपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत असून, तेल कंपन्यांनी आज सोमवारी पेट्रोल दरात आणखी १९ पैसे तर, डिझेल दरात १७ पैशांची कपात केली. आज झालेल्या कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर ७६.५२ रुपयांवर आला असून, हा गेल्या तीन महिन्यांतील नीचांकी दर आहे. एकलिटर डिझेलसाठी ग्राहकांना ७१.३९ रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर ८२.०४ रुपये असून, डिझेल दरात केलेल्या १८ पैशांच्या कपातीमुळे त्याचा दर ७४.७९ रुपयांवर आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel rate Decrease