इंधन दरवाढीचा भडका

पीटीआय
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

पेट्रोल-डिझेलच्या दरात पंधरवड्यात एक रुपयाची वाढ
नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पंधरवड्यात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ झाली आहे. सरकारने मात्र, ही दरवाढ तात्पुरती असून, दर लवकरच कमी होतील, असा आशावाद व्यक्त केला आहे. 

पेट्रोलच्या दरात बुधवारी प्रतिलिटर १३ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १४ पैसे वाढ झाली. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७८.१८ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ६९.६१ रुपयांवर गेला. डिझेलचा हा ऐतिहासिक उच्चांकी भाव आहे. दिल्लीत याआधी २९ मे रोजी डिझेलचा भाव ६९.३१ रुपयांवर गेला होता. त्याचवेळी पेट्रोलचा भावही प्रतिलिटर ७८.४३ रुपयांवर गेला होता. मागील १४ दिवसांत दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १.०४ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १.०३ रुपये वाढ झाली आहे. 

खनिज तेलाच्या भावातील वाढ तात्पुरत्या स्वरूपाची आहे, असे मला वाटते. तेलाच्या भावात घसरण झाल्यानंतर लवकरच इंधनदर कमी होतील. 
- सुभाषचंद्र गर्ग, आर्थिक कामकाज सचिव

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel Rate Increase