इंधन दरवाढ कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

शभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ सोमवारी कायम राहिली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैसे वाढ करण्यात आली. 

नवी दिल्ली - देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ सोमवारी कायम राहिली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १५ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैसे वाढ करण्यात आली. 

दिल्लीत आज पेट्रोलच्या दर प्रतिलिटर ८२.०६ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ७३.७८ रुपयांवर गेला. देशातील सर्व महानगरांमध्ये मुंबईत पेट्रोलचा दर आज सर्वांत जास्त राहिला. मुंबईत पेट्रोल ८९.४४ रुपये आणि डिझेल ७८.३३ रुपयांवर गेला. जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव आज काही प्रमाणात कमी झाले. चिनी उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याचा निर्णय अमेरिकेने तात्पुरता स्थगित ठेवला आहे. जागतिक पातळीवर आज खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल ७७.९३ डॉलरवर आला. 

१ ऑगस्टपासून दररोज दरवाढ 
देशात इंधनाचे दर १ ऑगस्टपासून दररोज वाढत आहे. यात केवळ १३ ऑगस्टला अपवाद असून, या एक दिवशी केवळ इंधनाचे दर कमी झाले होते. सलग दोन आठवडे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालीन उच्चांकी पातळीवर कायम आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel rate Increase