बँकांच्या शेअर्सवर लक्ष ठेवा...!

गौरव मुठे
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

शेअर बाजारात सध्या विविध क्षेत्रातील कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहे. परिणामी गुंतवणूकदार त्यानुसार आपल्या प्रतिसाद देत आहे. शिवाय अमेरिकेत होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जगभरातील शेअर बाजारांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होणे अपेक्षित आहे. मात्र या सध्याच्या काळात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

शेअर बाजारात सध्या विविध क्षेत्रातील कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहे. परिणामी गुंतवणूकदार त्यानुसार आपल्या प्रतिसाद देत आहे. शिवाय अमेरिकेत होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जगभरातील शेअर बाजारांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होणे अपेक्षित आहे. मात्र या सध्याच्या काळात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

सरलेल्या काळात बाँकिग क्षेत्राबाबत बुडीत कर्जाच्या प्रमाणात झालेल्या वाढीचा मुद्दा चर्चेत आहे. बँकांच्या बुडीत कर्जाच्या प्रमाणात झालेली वाढ चिंताजनक असून त्यमुले बँकांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतविलेल्या शेअरधारकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. मात्र विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील वाढत्या अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण वाढले आहे. मात्र वाढत्या प्रमाणाबाबत रिझव्‍‌र्ह बँक गंभीर त्याबद्दल विविध उपाययोजना योजल्या आहेत. 

रिझव्‍‌र्ह बँकेने सुरू केलेल्या ताळेबंद स्वच्छता कार्यक्रमातून सरलेल्या आर्थिक वर्षांत बहुतांश बुडीत कर्जासाठी (एनपीए) तरतुदी बँकांकडून केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता चालू वर्षांपासून केवळ थकीत कर्जातील ताजी भर हीच पतगुणवत्ता आणि बँकांच्या ताळेबंदावर ताण आणणारी बाब असणार. परिणामी बँकांचा पतपुरवठा आणि नक्त व्याजापोटी मिळणारे उत्पन्न वाढते आहे. शिवाय यामुळे नजीकच्या काळात एकूण उत्पन्न आणि निव्वळ नफाही वाढलेला दिसेल. मात्र एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण ताबडतोबीने खाली घसरलेले निश्चितच दिसणार नाही. बँकांमधील ही अवस्था काही एका रात्रीत नाहीशी होणारी नाही. मात्र कौशल्य आणि नावीन्यतेच्या जोरावर या समस्येचे निराकरण करता येणे शक्य आहे. आर्थिक वर्ष 2018 मध्ये त्यात लक्षणीय स्वरूपाची सुधारणा दिसण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2016 मध्ये एकूण थकीत कर्ज 2015 मधील रु.7.5 लाख कोटींच्या तुलनेत रु.10 लाख कोटींवर गेले, ते चालू आर्थिक वर्षाच्या अखेर रु.11.8 लाख कोटींवर पोचण्याची शक्यता आहे. 

* शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून 

शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातून विचार करावयाचा झाल्यास मात्र या दरम्यानच्या काळात बँकिंग क्षेत्राने बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छिणार्‍या नवीन गुंतवणूकदारांना बरीच संधी दिली आहे. गेल्या वर्षभरात सार्वजनिक असो वा खाजगी क्षेत्रातील बँकांच्या शेअर्सनी नवीन नीचांक गाठले. अश्यावेळी बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरले.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका

बॅंक                 चालू वर्षातील नीचांक      चालू वर्षातील उच्चांक    सध्याचा शेअरचा बाजारभाव (4 नोव्हें.2016)

स्टेट बॅंक ऑफ इंडिया    रु.148.30 (12 फेब्रुवारी)    रु.271.55 (7 सप्टेंबर)     रु.242.85
पंजाब नॅशनल बॅंक       रु.69.40  (7 फेब्रुवारी)     रु.150.40 (30 सप्टेंबर)   रु.131.60
बॅंक ऑफ इंडिया         रु.78.60 (24 मे)         रु.124 (8 सप्टेंबर)       रु.106.45
देना बॅंक                  रु.25.60 (29 फेब्रुवारी )    रु.41.50 (8 जुलै )       रु.36.20
बॅंक ऑफ बडोदा         रु.109.45 (15 फेब्रुवारी)    रु.170.75 (7 सप्टेंबर)     रु.142.45
कॅनरा बॅंक               रु.156.20 (26 फेब्रुवारी)    रु.339 (15 ऑक्टोबर)     रु.290.10

---------------------------------------------------------------            
खाजगी क्षेत्रातील बॅंका
बॅंक                 चालू वर्षातील नीचांक      चालू वर्षातील उच्चांक    सध्याचा शेअरचा बाजारभाव (4 नोव्हें.2016)

आयसीआयसीआय       रु.180 (26 फेब्रुवारी)    रु.291.50 (25 ऑक्टोबर)     रु.269.70
आक्सिस बॅंक             रु.366.65 (8 जानेवारी)    रु.638.25(7 सप्टेंबर)       रु.478.10
येस बॅंक                    रु.632.25 (6 जानेवारी)    रु.1450 (7 सप्टेंबर)       रु.1196.40
एचडीएफसी बॅंक          रु.928.80 (28 फेब्रुवारी)   रु.1318.20 (23 सप्टेंबर)   रु.1243.70

वरील आकडेवारीचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल की, सध्या बँकांचे शेअर्स त्यांच्या वर्षभरातील नीचांकी पातळीपासून दीड पटीने वधारले आहेत.

आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतीय बँकांचे बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होत असून येत्या वर्ष – दीड वर्षांत देशातील बँकांची स्थिती सुधारेल. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा बँकांची बुडीत कर्जाबाबतची स्थिती उल्लेखनीय असल्याचे काही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी सांगितले आहे. 

शिवाय रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार बँका त्यांच्या कर्जाबाबतच्या मालमत्ता गुणवत्तेला प्राधान्य देत असून एकूणच बुडीत कर्जाबाबत बँकांकडून सकारात्मकरीत्या गतीने पावले उचलली जात असल्याचेही अमेरिकास्थित पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. बँकांची मालमत्ता गुणवत्ताही येत्या काही महिन्यांमध्ये सुधारेल. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सध्या खूपच आशादायी चित्र आहे. त्यामुळे सध्या बँकांमध्ये केलेल्या 'एफडी'पेक्षा शेअर बाजारात बँकांच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास अधिक परतावा प्राप्त होईल. 

Web Title: Gaurav Muthe write about bank shares