गौतम अदानी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना अदानींनी मागे टाकले आहे
Gautam Adani richest person
Gautam Adani richest person

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत अदानी समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गौतम अदानी (Gautam Adani) यांची संपत्ती मंगळवारी ८८.५ बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचं ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने म्हटले आहे. मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) एकून संपत्ती ही ८७.९ बिलीयन डॉलर्स इतकी आहे. अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये १२ बिलीयन डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्षांत सर्वाधिक संपत्ती वाढलेले अदानी हे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

Gautam Adani richest person
अदानी, अंबानींची 'श्रीमंती'; फेसबुक किंग मार्क झुकेरबर्गला टाकले मागे

गेल्या दोन वर्षांमध्ये अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत ६०० टक्क्यांनी वाढली आहे. अदानी समूह २०७० मध्ये भारताचं झीरो कार्बन उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेला प्राधान्य देत आहे. त्यामुळे भविष्यात अदानी समूहाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

Gautam Adani richest person
सोन्याच्या दरात किरकोळ तर चांदीच्या दरात मोठी वाढ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com