भारतीय अर्थव्यवस्थेची 7.3 टक्के वाढ 

पीटीआय
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 7.3 टक्के झाली असून, त्याआधीच्या तिमाहीत ती 7.1 टक्के होती. उत्पादन, सेवा आणि व्यापार क्षेत्रातील वाढ याला कारणीभूत ठरली आहे. 

देशांतर्गत एकूण उत्पादन (जीडीपी) मागील आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत 7.6 टक्के होते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत एकूण मूल्यवर्धित (जीव्हीए) 7.1 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी याच काळात ती 7.3 टक्के होती. जीडीपी म्हणजे जीव्हीए अधिक उत्पादनांवरील कर वजा त्यांच्यावरील अंशदान आहे. 

दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि सेवा क्षेत्रात सात टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे. कृषी 1.8 टक्के, वनकाम व मत्स्योत्पादन उणे 0.4 आणि खाण व बांधकाम क्षेत्रात 1.5 टक्के वाढ झाली आहे.  

Web Title: GDP rises 7.3% in Q2; uncertainty looms due to demonetisation