जर्मनी भारतात करणार 8 हजार कोटींची गुंतवणूक

 Germany to invest 1 billion euro for green urban mobility in India
Germany to invest 1 billion euro for green urban mobility in India

 नवी दिल्ली - जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांनी येत्या पाच वर्षांत 1 अब्ज युरोची गुंतवणूक करण्याचे वचन दिले. ग्रीन अर्बन मोबिलिटी अंतर्गत देशात येत्या पाच वर्षात 1 अब्ज युरो म्हणजेच 8 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 

 दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या विषयावर लक्ष वेधतांना मार्केल म्हणाल्या की, ''परिस्थितीची तीव्रता पाहता,. दिल्लीमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेल वाहनांच्या ऐवजी इलेक्ट्रिक वाहने वापरणे गरजेचे आहे. तसेच भारतातील पर्यावरणासंबंधित समस्या सोडविण्यासाठी आम्ही भारताला सहकार्य करणार आहोत. तामिळनाडूतील बस सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी जर्मनी 20 कोटी युरोची मदत करणार आहे. 

दिल्ली व परिसरातील वायू प्रदूषण दिवाळीपासून धोक्‍याच्या पातळीवर पोचलेले आहे. प्रदूषणाची पातळी गुरुवारी (ता. 31) रात्री उशिरा ‘सर्वांत घातक’ किंवा ‘आणीबाणी’च्या श्रेणीत पोचल्याने पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध आणि नियंत्रण) प्राधिकरणाने (ईपीसीए) बांधकामांवरही मंगळवारपर्यंत (ता. 5) बंदी घातली आहे. 

भारत आणि युरोपियन युनियन (ईयू) यांच्यात मुक्त व्यापार करारासाठी रखडलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी देखील जर्मनीने सहमती दर्शविली.
दोन्ही बाजूंनी महत्त्वपूर्ण विषयांवर वाटाघाटी अयशस्वी ठरल्यामुळे या कराराची चर्चा मे 2013 पासून रखडली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com