‘जीआयसी’, ‘न्यू इंडिया’ करणार शेअर बाजारात श्रीगणेशा

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

नवी दिल्ली: जीआयसी आणि न्यू इंडिया अॅश्युरन्सच्या नोंदणीने सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपन्यांचा शेअर बाजारात श्रीगणेशा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात सर्वसाधारण विमा क्षेत्रातील पाच सरकारी कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.

या दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने नोंदणीचा प्रस्ताव आधीच मंजुर केला होता. नोंदणीचा निर्णय, निर्गुंतवणूकीचे प्रमाण आणि इतर गोष्टींबाबत निर्णय झाल्यानंतर कंपन्यांना अर्थ मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी मोठा वेळ लागत असल्याने चालू आर्थिक वर्षात नोंदणीची शक्यता कमी असल्याचे मत सुत्रांनी व्यक्त केले आहे.

Web Title: GIC New india share start