‘ग्लेनमार्क’च्या प्रकल्पाला यूएसएफडीएकडून ‘ईआयआर’ प्राप्त

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई: फार्मा क्षेत्रातील 'ग्लेनमार्क'ला अमेरिकी अन्न औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) गुजरातमधील अंकलेश्वर प्रकल्पाचा 'स्थापना तपासणी अहवाल' म्हणजेच एस्टॅब्लिशमेंट इनस्पेक्शन रिपोर्ट (ईआयआर) प्राप्त झाला आहे. या सकारात्मक बातमीमुळे ग्लेनमार्कचा शेअर सकाळच्या सत्रात 3 टक्क्यांनी वधारला होता. शेअरने इंट्राडे व्यवहारात 929.90 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

'ग्लेनमार्क'ला यूएसएफडीएकडून गुजरातमधील अंकलेश्वर प्रकल्पाचा अहवाल प्राप्त झाला आहे. ज्यावेळी कंपनीमध्ये सर्व सुविधांची पूर्तता करण्यात येते त्यावेळी एफडीएकडून अहवाल देण्यात येतो, असे 'ग्लेनमार्क'ने मुंबई शेअर बाजाराला दाखल केलेल्या अहवालात सांगितले आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात 'ग्लेनमार्क'चा शेअर 908.10 रुपयांवर व्यवहार करत असून तो 17.20 रुपयांनी म्हणजेच 1.93 टक्क्यांनी वधारला आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 671.50 रुपयांची नीचांकी तर 995.75 उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.25,623.69 कोटींचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Glenmark's Ankleshwar plant gets USFDA clearance