जागतिक बॅंकेच्या अध्यक्षांचा ‘दे धक्का’

पीटीआय
बुधवार, 9 जानेवारी 2019

वॉशिंग्टन - जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जीम योंग किम यांनी सोमवारी अचानक पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. हा निर्णय ट्रम्प सरकार व जागतिक बॅंकेच्या इतर सदस्य देशांत होऊ घातलेल्या नवीन संघर्षाची नांदी मानला जात आहे. 

किम यांची २०१७ मध्ये या पदावर पाच वर्षांसाठी फेरनिवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपणार होता. मात्र, त्याअगोदरच किम यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानुसार ते चालू महिन्याच्या अखेरीस हे पद सोडणार असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असून, सीईओ क्रिस्टालिना जॉर्जिव्हा १ फेब्रुवारीपासून अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतील, अशी माहितीही बॅंकेने दिली. 

Web Title: Global Bank Chairman Suspend