गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअरमध्ये तब्बल 13 टक्के वाढ का?

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

मुंबई: गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअरमध्ये आज(बुधवार) इंट्राडे व्यवहारात तब्बल 13 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचा शेअर वर्षभराच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. कंपनीने पुणे, मुंबई आणि एनसीआर भागात तब्बल 1,000 अपार्टमेंट्सची विक्री केल्याची माहिती शेअर बाजारात दिली आहे. सध्या कंपनी 12 शहरांमध्ये निवासी, व्यावसायिक व टाउनशिप प्रकल्पांचा विकास करीत आहे.

कंपनीने काल शेअर बाजार बंद झाल्यानंतर सादर केलेल्या निवेदनात सांगितले की, कंपनीने मार्च महिन्यापासून तीन नव्या प्रकल्पांमधील तब्बल 1,000 अपार्टमेंट्सची विक्री केली आहे. यामध्ये द ट्रीज् प्रकल्पातील गोदरेज ओरिजिन्स, ग्रेटर नॉयडामधील गोदरेज गोल्फ लिंक्समधील दि सूट्स आणि हिंजवडी येथील गोदरेज 24 प्रकल्पाचा समावेश आहे.

सध्या(बुधवार, 12 वाजून 5 मिनिटे) 557.10 रुपयांवर व्यवहार करत असून 52.00 रुपये अर्थात 10.29 टक्क्यांनी वधारला आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असणाऱ्या शेअरने वर्षभरात 285 रुपयांची नीचांकी तर 585.05 रुपयांची उच्चांकी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 12,073.15 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Godrej Properties zooms 14% after it sells over 1,000 units across 3 projects