esakal | Gold Prices: सोने-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजच्या किंमती
sakal

बोलून बातमी शोधा

india gold

जागतिक बाजारपेठेच्या परिणाम आज देशांतर्गत बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला. शुक्रवारी सोन्याचे दरात वाढ झाली आहे.

Gold Prices: सोने-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजच्या किंमती

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेच्या परिणाम आज देशांतर्गत बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला. शुक्रवारी सोन्याचे दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (MCX) डिसेंबरमधील सोन्याचे भाव 0.8 टक्क्यांनी वाढून 50 हजार 584 रुपये झालं आहे. तसेच चांदीच्या दरातही 1.8 टक्क्यांची वाढ होऊन 61 हजार 605 रुपये प्रति किलो झाले आहे. यापुर्वी सोन्याच्या भावात 142 रुपये आणि चांदीच्या दरात 0.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑगस्टमध्ये सोने-चांदीच्या दरात उच्चांकी वाढ-
2020च्या ऑगस्ट महिन्यात सोने आणि चांदीच्या आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली होती. ऑगस्टमध्ये 10 ग्रॅम सोने 56 हजार 200 रुपये आणि चांदी 80 हजार रुपयांवर पोहोचले होते. आता सप्टेंबर महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला जवळपास 6 हजारांनी उतरले आहे.

आरोग्य विमा घेण्यापूर्वी घ्या काळजी;  IRDAIने दिली महत्वाची माहिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोने बाजारात सकारात्मक चित्र निर्माण झाले होते. अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले आहे की, मदत पॅकेजबाबत सध्या काँग्रेसशी चर्चा सुरू झाली आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलर घटल्याने पिवळ्या धातूला फायदा झाल्याचे दिसले आहे. स्पॉट सोन्याची किंमत प्रति औंस सुमारे 1898 डॉलर होती. तर डॉलर निर्देशांक 20. टक्क्यांनी घसरला आहे. हा सलग दुसरा आठवडा आहे ज्यात डॉलरमध्ये घट दिसून आली आहे. महागाईवर मात करण्यासाठी सोने नेहमी मदतीचं ठरत आहे.

मध्यवर्ती बँका कमी सोने खरेदी करत आहेत-
जगभरातील मध्यवर्ती बँकांनीही सोन्याची खरेदी कमी केली आहे. एका आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात या मध्यवर्ती बँकांनी खरेदी केलेल्या सोन्यापेक्षा जास्त सोने विकले गेले आहे. यापुर्वी दीड वर्षांपूर्वी मध्यवर्ती बँकांनी सातत्याने सोने खरेदी केले होते. सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होण्याचे हे एक कारणही आहे.