सोने, चांदी वधारले 

पीटीआय
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई : स्थानिक बाजारपेठेत मागील दोन दिवस सोने आणि चांदीच्या भावात सुरू असलेली घसरण बुधवारी थांबली. स्टॅंडर्ड सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १७५ रुपयांनी वाढून ३१ हजार ३२५ रुपयांवर गेला. याच वेळी शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम १७५ रुपयांनी वाढून ३१ हजार ४७५ रुपयांवर गेला. चांदीच्या भावात आज प्रतिकिलो २०५ रुपयांची वाढ होऊन तो ३९ हजार ४७५ रुपयांवर गेला. जागतिक पातळीवर डॉलरच्या मूल्यात वाढ झाल्याने सोन्याच्या भावात आज घसरण झाली. सोन्याचा भाव प्रतिऔंस १ हजार ३२५ डॉलर होता. चांदीच्या भावातही घसरण होऊन तो प्रतिाऔंस १६.५८ डॉलरवर आला.  

Web Title: Gold and silver rate increase