आंतराष्ट्रीय बाजारात सोने उतरले; भारतातील दरही कमी होणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 August 2020

सोन्याचे दराने 7 ऑगस्टला उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली. अमेरिका सेंट्रल बॅंक फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल (US federal reserve chairman Jerome Powell) यांच्या भाषणानंतर सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. यामध्ये पॉवेल यांनी महागाईचा सामना करून नोकऱ्या वाढवण्यावर भर दिला जाईल असं सांगितलं होत. याचा परिणाम मार्केटवर झाला असून त्यामुळेच सोन्याच्या किंमती कमी झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली - सोन्याचे दराने 7 ऑगस्टला उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली. अमेरिका सेंट्रल बॅंक फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल (US federal reserve chairman Jerome Powell) यांच्या भाषणानंतर सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. यामध्ये पॉवेल यांनी महागाईचा सामना करून नोकऱ्या वाढवण्यावर भर दिला जाईल असं सांगितलं होत. याचा परिणाम मार्केटवर झाला असून त्यामुळेच सोन्याच्या किंमती कमी झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मागील सत्रात डॉलर मजबूत झाला होता, ज्यामुळे आंतराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीत किंमतीत घट दिसून आली आहे. COMEX ( commodity exchange) मध्येही 2 टक्क्याने सोन्याच्या किमती पडल्याने आता भारतातील सोने बाजारातील किंमतीही उतरू शकतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तज्ज्ञांच्या मते, 7 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतींनी भारतीय स्थानिक बाजारात प्रति दहा ग्रॅम 56200 रुपयांच्या उच्चांक गाठला होता. यानंतर सोन्याच्या किंमती सतत खाली येत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अमेरिकन डॉलर मजबुत होऊ लागल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण जाणवली. गुरुवारी सोन्याचे दर दहा ग्रॅमची किंमत 743 रुपयांनी वाढून 52 हजार 508 रुपयांवर पोहोचली होती. यापूर्वी बुधवारी सोने प्रति 10 ग्रॅम 51 हजार 765 रुपयांवर बंद झाले होते. त्याच वेळी दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 3615 रुपयांनी वाढून 68 हजार 492 रुपये प्रति किलो झाला होता.

व्याजदर कपातीसह इतर उपायही भात्यात; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे वेबीनारमध्ये सूतोवाच

सोन्याच्या दराचा आपण इतिहास पाहिला तर, सोने नेहमी जागतिक संकटाच्या वेळेस महागलं आहे. यामध्ये मग 70 च्या दशकांतील जागतिक युध्दपरिस्थिती असेल किंवा अरब युध्दाचा प्रसंग असो, याकाळात सोने मोठ्या प्रमाणात महागले होते. सध्या कोरोनामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी अस्थिरता दिसत आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 2500 हजार डॉलरपर्यंत जातील, असं तज्ञांनी सांगितलं आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold landed in the international market Rates in India will also come down