ब्रेकिंग : सोने, चांदीच्या भावात वाढ; पाहा आजचे भाव

वृत्तसंस्था
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

दिल्लीत आज सोन्याचा भाव 460 रुपयांनी तर चांदीचा भाव 1 हजार 96 रुपयांनी वाढला.

नवी दिल्ली ः खनिज तेलाचे वाढलेले भाव आणि कमकुवत झालेला रुपया यामुळे गुंतवणूकदारांनी सोमवारी पुन्हा सोन्याकडे मोर्चा वळविला. दिल्लीत आज सोन्याचा भाव 460 रुपयांनी तर चांदीचा भाव 1 हजार 96 रुपयांनी वाढला.

मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या भूराजकीय तणावामुळे गुंतवणूकदार हे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे वळले. यामुळे जागतिक पातळीवर आज सोने आणि चांदीचा भाव आज वाढला. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 504 डॉलर आणि चांदीचा भाव प्रतिऔंस 17.87 डॉलरवर गेला. दिल्लीतील सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव आज प्रतिदहा ग्रॅमला 460 रुपयांनी वाढून 38 हजार 860 रुपयांवर गेला. चांदीचा भावही प्रतिकिलोमागे 1 हजार 96 रुपयांनी वधारुन 47 हजार 957 रुपयांवर पोचला.

मुंबईतही सोने वधारले
मुंबईतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 209 रुपयांची वाढ होऊन 37 हजार 936 रुपयांवर गेला. याचवेळी स्टॅंडर्ड सोन्याचा भावही 208 रुपयांनी वधारून 37 हजार 784 रुपयांवर पोचला. चांदीचा भावही प्रतिकिलोमागे 330 रुपयांची घसरण होऊन 46 हजार 65 रुपयांवर आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Price Silver Price increased