सोनं महागण्याची शक्यता, आताच करा खरेदी; जाणून घ्या आजची किंमत

सोनं महागण्याची शक्यता, आताच करा खरेदी; जाणून घ्या आजची किंमत

Gold Prices Today : होळीच्या मुहर्तावर तुम्ही सोन्याची खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. होळी आधी आठवडाभरापासून सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज घसरण झाल्याचं दिसत आहे.  आज, २२ कॅरेटच्या सोन्याची किंमत ४३ हजार ७६० रुपये प्रति तोळा इतकी झाली. शनिवारी २२ कॅरेटच्या सोन्यामध्ये १६० रुपयांनी घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे २४ कॅरेटच्या सोन्यामध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. शनिवारी २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत  प्रति तोळा ४४ हजार ७६० इतकी झाली आहे. 

गुड रिटर्न संकेतस्थळानुसार, दिल्लीमध्ये २२ कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति तोळा 43,850 रुपये इतकी आहे. तर  चेन्नईमध्ये 42,160 रुपये, मुंबईत 43,760 रुपये प्रति तोळा किंमत आहे. सोन्याच्या उच्चांकी वाढीनंतर मागील सहा महिन्यापांसून सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यात सोन्याच्या किंमतीमध्ये तब्बल दहा रुपयांनी घसरण झाली आहे. 

आजची किंमत किती? 
२२ कॅरेटच्या सोन्याची किंमत देशांमध्ये सर्वाधिक कमी केरळमध्ये आहे. शनिवारी केरळमध्ये २२ कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति तोळा ४१ हजार ७०० रुपये आहे. तर २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत ४५ हजार ४९० रुपये प्रति तोळा इतकी आहे. लखनऊमध्ये २२ कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रतितोळा 43,850 रुपये तर २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रतितोळा 47,840 रुपये आहे. पाटनामध्ये २२ आणि २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत अनुक्रमे, 43,760 आणि 44,760  प्रतितोळा इतकी आहे. 

४८ हजार रुपये तोळ्यापर्यंत सोन्याची किंमत पोहचण्याची शक्यता -
सोन्याच्या मार्केटमधील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, लवकरच सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शख्यता आहे. सध्या प्रतितोळा सोन्याची किंमत ४३ हजार ते ४५ हजारांच्या दरम्यान आहेत. मात्र, पुढील काही दिवसांत MCX वर सोन्याची किंमत ४६ हजार ते ४८ हजार रुपये प्रतितोळा होऊ शकतं. अनुज गुप्ता म्हणाले की, पुढील दोन महिन्यात सोन्याच्या किंमतीमध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता असून सोनं ४८ हजार प्रतितोळ्यापर्यंत पोहचू शकतं. तसेच चांदीच्या किंमतीमध्येही विक्रमी वाढ होऊ शकते.  पुढील दोन महिन्यात चांदीची किंमत प्रति किलो, ७२ हजार रुपयांपर्यंत पोहचू शकते. 

आताच सोन्यात गुंतवणूक का करावी?
सोन्यामधील गुंतवणूक फायद्याचं असल्याचं आपल्याला माहितच आहे. अनेक तज्ज्ञांनी तसा सल्लाही दिला आहे. सध्या सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. पुढील काही दिवसांता सोन्याच्या किंमतीमध्ये प्रतितोळा तीन ते चार हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर चांदीची किंमत प्रति किलो ७२ हजारांवर जाऊ शकतं.  IIFL सिक्योरिटीजमध्ये कमोडिटीज आणि करेन्सी ट्रेडचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की,  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीही घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूड यंदाच्या 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचलं आहे. भविष्यात ही किंमत वाढू शकते. तेव्हा सोन्याच्या किंमतीमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सध्याची वेळ अतिशय उत्तम आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com