अक्षय तृतीयेनिमित्त सोन्याला मिळाली झळाळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

पिंपरी - सोनेखरेदी हा भारतीयांचा आवडता विषय. विविध सण-समारंभांच्या निमित्ताने सोनेखरेदी केली जाते. त्यातील एक सण म्हणजे अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा मुहूर्त साधत आज (शुक्रवारी) नागरिकांनी सोन्याची मोठी खरेदी केली. सराफ बाजार दिवसभर गर्दीने फुलून गेला होता. गुढीपाडव्यापेक्षा आज जास्त खरेदी झाल्याचे सराफांनी सांगितले. 

अक्षय तृतीयेला खरेदी वा कार्यारंभ केल्यास उत्तरोत्तर प्रगती होते, असे मानले जाते. या दिवशी सोने-चांदीखरेदीचाही मुहूर्त साधला जातो.

लग्नसराईच्या पार्श्‍वभूमीवरदेखील वधू-वरांसाठी दागिने खरेदी करण्यासाठी या दिवसाची खास निवड केली जाते. त्यामुळे यंदाही सोनेखरेदीला उधाण आले होते. 

सकाळी नऊपासून नागरिकांनी सोनेखरेदीला सुरवात केली. दुपारपर्यंत सुवर्णपेढ्या गजबजून गेल्या होत्या. एकूण ग्राहकांच्या जवळपास ३० ते ४० टक्के नागरिकांनी वेढणी, बिस्किटे आणि नाण्यांची खरेदी केली; तर अन्य ग्राहकांनी दागिन्यांना पसंती दिली. महिलांकडून वजनाने हलक्‍या असलेल्या दागिन्यांना मोठी मागणी होती; तर सोन्याची चेन, अंगठ्या, ब्रेसलेट आदी दागिन्यांचीही खरेदी केली गेली. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीमध्ये झालेली उलाढाल लक्षात घेऊन अक्षय तृतीयेलाही मोठी खरेदी होईल, असा सराफांचा अंदाज होता. त्यामुळे सर्वांनीच जय्यत तयारी केली होती. वैविध्यपूर्ण दागिन्यांचे असंख्य प्रकार तयार ठेवण्यात आले होते. बहुतांश नागरिकांनीही या रेडिमेड दागिन्यांना पसंती दिली. 

तीस टक्‍क्‍यांनी वाढ
‘‘आज सोन्याच्या दागिन्यांचा दर प्रतितोळा २८ हजार १५० रुपये होता; तर शुद्ध सोन्याचा दर २९ हजार ५० रुपये होता. मागील अक्षय तृतीयेच्या तुलनेत यंदा सोन्या-चांदीची विक्री ३० ते ४० टक्‍क्‍यांनी अधिक झाली. गुढीपाडव्याच्या तुलनेत ग्राहकांचे प्रमाणही १० ते २० टक्‍क्‍यांनी अधिक होते,’’ अशी माहिती सोनिगरा ज्वेलर्सचे दिलीप सोनिगरा यांनी दिली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात आणलेल्या आमच्या ‘आराधना’ आणि ‘भोजनी’ कलेक्‍शनलाही सर्वाधिक मागणी होती, असेही ते म्हणाले.

Web Title: gold purchasing akshay tritiya