सोन्याची झळाळी कमी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - येथील सराफी बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने बुधवारी सोन्याच्या भावात घसरण झाली. जागतिक पातळीवर कमी झालेला भाव आणि स्थानिक सराफांकडून कमी झालेली मागणी भाव कमी होण्यास कारणीभूत ठरली. स्टॅंडर्ड सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ७५ रुपयांची घसरण होऊन ३० हजार ६८० रुपयांवर आला. याचवेळी शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ७५ रुपयांची घट होऊन ३० हजार ८३० रुपयांवर आला. चांदीच्या भावात प्रति किलो १८५ रुपयांची घसरण होऊन तो ३८ हजार ३५५ रुपयांवर आला. जागतिक पातळीवर सोन्याचा भाव प्रति औंस १ हजार ३३६ डॉलर होता. चांदीचा भाव प्रति औंस १६.४५ डॉलर होता. 

Web Title: gold rate down

टॅग्स