esakal | Gold Price - सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या भाव
sakal

बोलून बातमी शोधा

gold

Gold Price - सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; जाणून घ्या भाव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं दिसत आहे. याआधी काही काळ सोन्याचे दर स्थिर राहिले होते. मात्र आता ते कमी होत आहेत. डॉलरची किंमत वधारल्यानंतर सोन्याच्या किंमती कमी झाल्याचं दिसतंय. गुरुवारी सोन्यासह चांदीचे दरही घसरले होते.

दिल्लीतील सराफ बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात 259 रुपयांची घसरण झाल्यानं दर प्रति दहा ग्रॅओम 48 हजार 127 रुपये इतका झाला होता. त्याआधी सोन्याचा दर 48 हजार 386 रुपये इतका होता. तसंच चांदीचा दरही 110 रुपयांनी कमी झाला. एक किलो चांदीची किंमत 70 हजार 274 रुपये झाली. चांदीचा दर 70 हजार 384 रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 1880 डॉलर तर चांदी प्रति औंस 27.65 डॉलर होता.

हेही वाचा: आठवड्याचं शेवटचं ट्रेडिंग सत्र, काय असावी आजची स्ट्रॅटजी?

देशातील प्रमुख शहरांपैकी दिल्लीत 22 कॅरेट सोनं 47 हजार 950 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 52 हजार 300 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार 880 रुपये इतका आहे. तर कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 900 रुपये इतका आहे. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 50 हजार 350 रुपये आहे.